"दिल है छोटासा....
छोटीसी आशा....."
...
Hope.... आशा....
आशा.....हा शब्द असा आहे ...जो जगण्याचा मार्ग देतो....जे आहे ते बदलेल...आणि नवीन काहीतरी होईल....हे कोणताही ज्योतिष येऊन सांगितला तरी आपण तात्पुरते....motivate होऊ शकतो.....
पण आयुष्यभरासाठी च motivation हे आशेतून येत....आणि आशा ही self motivated असते.....जी आपल्या स्वतः मधे असते....म्हणजे जगण्याचा मार्ग....ताकद सगळं स्वतः त असताना आपण त्या मृगा सारखे ते शोधत फिरत असतो....
आपल्याकडे काहीही नसले तरी चालेल पण माणुसकी हवी...अस म्हणतात....माणुसकी हवीच....गरज आहे....भावना आहे ती... पण आशा हा जीवनाचा मार्ग आहे....जीवनाची सुर वातच आशेने होत असते....
खर तर ज्यांची आशा संपते ....त्यांचं आयुष्य थांबत.....
एका आभांगमध्ये संत तुकाराम महाराज सांगून गेलेत....
आशा हे समूळ खानोनी काढावी l तेव्हाची गोसावी व्हावे तेने ll१ll
नहीं तरी सुखे असावे संसारी l फजिती दुसरी करू नये ll ध्रु.ll
आशा मारूनिया जयवंत व्हावे l तेव्हाची निघावे सर्वांतूनी ll २ ll
तुका म्हणे जरी योगाची तांतडी l आशेची बिबुडी करी आधीं ll ३ ll
महाराज ही सांगून गेले जो या संसारात आहे....त्याला आशा आहे....ज्याला संसार त्यागयचा आहे....त्याला आशा ही त्यागावी लागेल.....म्हणजेच काय.....तर आशा आहे म्हणून तो संसारात आहे.....
साधं आपण एक भाजीचा बी लावला ...तरी तो लावताना आशा असते....
लहान मूल धावत येत....आपण बाहेरून आल्यावर....त्याला आशा असते....
नवीन कोणतीही गोष्ट घेताना ...आशा असते...
रोज संध्याकाळी ...मनात आशा असते उद्याचा दिवस वेगळा जाईल.....ही जी काही दोन शब्द असतात...ती जगण्याची प्रेरणा देतात.....
आशा सगळ्यांच्या मनात असते.....
आशेविन जगणे....जगणे नसे...
आशेसहित मरण....त्यास मुक्ती नसे....
जीवाला जर मुक्त व्हायचे असेल ...तर सगळ्या आशा ....सगळ्यांकडून आशा करण सोडून द्यावं लागेल.....
आणि मनुष्य स्वभाव असा आहे....जोपर्यंत जिवंत आहे ...श्वास आहे..... तोपर्यंत कोणतीच गोष्ट सोडत नाही....
कारण सोडलं तर निसटत....आणि निस्टणाऱ्या गोष्टी हातात परत घेण्यासाठी....फक्त धावत राहावं लागतं...
आणि तेच आपण करतोय....सोडतो.... पण पुन्हा हातात घेण्यासाठी ...आणि....धावतो....मग आपण सोडतोच का.....?....आणि सोडतो...तर मग परत धावतो का...?....हे कळेपर्यंत आयुष्याचं निसटून जात.....
म्हणूनच संत सांगून गेलेत....आहे त्यात समाधानी रहा आयुष्यात....नाहीतर ना संसार करू शकाल ...ना संन्ञास.....आसच आयुष्याला फसवत राहाल...आणि आयुष्य तुम्हाला.....
आणि फसवणूक.... करण....म्हणजे पाप.....म्हणजे आपल्याच आयुष्यात...आपल्याच जीवनाशी...आपणच फसवणूक करतोय....आणि त्याच जे पाप आहे....तेही आपल्याच माथी..,..मग इतकं नुकसान का करून घेतोय आपण...?
...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा