मेणबत्ती.....
शांत जळत होती...लाईट नव्हती.... अंधार पडला होता.... सगळीकडेच अंधार होता....त्या अंधारात मेणबत्तीचाच सहारा होता....फार काळ वीज नव्हती जाणार... पण तरीही तो थोडासा काळही नकोसा वाटत होता....विजेची सवय इतकी जास्त झाली होती की आंधरात आता ५ मिनिटे राहणे ही मुश्किल वाटत होते....वीज नव्हती ...मेणबत्ती तीच काम करत होती.... पण अंधार असल्यामुळे मलाच काही काम सुचत नव्हते ..मग मी थोडेसे बाहेर गेले...gallary...balcony....terrace... आजकाल याचाच सहारा उरलाय.....थोडी हवा खावीशी वाटली की जायचं तिथं....गावाकडे असल की कस बर असायचं....थोडंसं बाहेर जाऊन फिरून यायचं... पण इथे ती सोय नव्हती....असो...लाईट नव्हती म्हणून बाहेर आले...गच्चीत...सगळीकडेच अंधार होता.....शांत होत वातावरण कशाचाच आवाज नव्हता मुळी....त्या शांततेत...गच्चीत उभी होते....तर अचानक आवाज आला वीज आली वीज आली...टीव्ही लावा ..मोबाईल चार्जिंग लावा...battery चार्जिंग लावा.....त्यावेळी क्षणभर अस वाटल उगाचच वीज आली....वीज नव्हती तर थोड्यावेळसाठी का होईना थोड शांत वातावरण अनुभवता येत होत.... पण...असो...लाईट आली आणि मी आतमध्ये निघून गेले.....हे असच आपल्या मनासोबत पण आपण एकदा करायला हवे..मनाच्या..सगळ्या lights off करून एकदा शांत बसून आपल्या मनाला विचारायला हवे तुलाही थोडी मोकळी हवा हवी आहे का.....मोकळ्या हवेतली शांतता तुलाही अनुभवायची आहे का.....त्या मनाला ही किती समाधान मिळेल....त्या शांततेत ..मोकळ्या हवेत....नको असणाऱ्या उजेडा पेक्षा ...शांतता आणि समाधान देणारा आंधार हा केव्हाही चांगलाच....अंधार म्हणजे काळोख...म्हणजे वाईट काहीतरी...हेच आपल्याला आजपर्यंत माहीत आहे.... पण अंधार म्हणजे तीमिर....म्हणजे तो....जो प्रकाश येईपर्यंत वाट पाहत असतो तो....प्रकाश येणार आहे याची जाणीव करून देतो.... तिमिरतूनी तेजाकडे....हा प्रवास खूप भारी आहे....ह्या प्रवासात पाहिलं जात की तुमच्याकडे सहनशक्ती किती आहे....तुमच्याकडे त्या तीमिरकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे.....अंधार आहे म्हणून काळोख ओढवण्यापेक्षा..... तिमिर आहे आणि तेज येणार आहे म्हणालो तर.....खूप सकारात्मक वाटत ना....आपल्या फक्त सकारात्मक वटण्याने च खूप बदल होतात...बदल होण्यासाठी.....आपल्या सोबत जर अंधरही येत असेल तर फरक नाही पडत....फक्त इतकं माहीत हवं की अंधार सोबत येतोय ...सोबत आहे... पण तो माझा कायमचा सोबती नक्कीच नाही..... तिमिर आयुष्यात नक्की हवा .... सोबत हवा...फक्त सोबती म्हणून नको........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा