माझ्या एका friend साठी बनवली होती........
बाप. ......
......
खरं तर आई विषयी लिहायला शब्द कमी पडतात....
आणि बापाविषयी लिहायला शब्द च सुचत नाहीत...
कारण प्रेमाला नेहमीच कवितारुपी शब्दात बांधलं जातं......
पण तो बापच असा असतो ..की तो नाही शब्दात सामावू शकतो ..नाही त्या कवितांत....
आकाशातल्या त्या सूर्याप्रमाणे असतो तो बाप
जो स्वतः तळ पतो पण आपल्या सूर्यमलेला कधीच आंधरात ठेवत नाही.....
नारळ सारखा वरून जरी कठोर ..कणखर वाटत असला ...तरी त्याच्या मनमनातून त्याच्या मुलांसाठी गोड पाण्याचा झरा नेहमीच वाहत असतो....
मुलांचं आयुष्य मार्गी लावता लावता त्याची झालेली परवड...
फक्त आपल्या मुलांच्या ईच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो आपल आख्ख आयुष्य खर्च करतो तो असतो बाप....
स्वतःसाठी खर्च करताना फायद्याचा विचार करणारा बाप...
मुलांसाठी मात्र आख्ख आयुष्य खर्च करून टाकतो...
क्षितिजापलीकडले पसरलेल्या मुलांच्या या आंधरारुपी आयुष्यात...
प्रकाशाचा एक किरण असतो बाप....
आई च विश्व असतात तिची मुले....
पण बापच आयुष्य च असतात ती...
कारण तो जगत च असतो त्यांच्या सुखासाठी...
मुलगी सासरी जाताना कोपऱ्यात बसून हुंदके देत रडणारा बापच असतो.....
स्वतःच आयुष्य मोडून ...मुलांच्या आयुष्याच्या शिदोरीची तयारी करणारा असतो तो बाप.....
असा हा बाप भर उन्हात सावली देणाऱ्या वृक्षासारखा असतो.....
जोपर्यंत उन्हाचे चटके आणि झळ बसत नाही.....
तोपर्यंत त्या वृक्षरुपी बापाची किंमत कधीच कळत नाही....
जोपर्यंत त्याच्यात ताकद आहे तोपर्यंतच तो ऊन , वारा, पाऊस, गारा, यांची झळ सोसतो...
पण एक ना एक दिवस त्याचीही ताकद संपते ...आणि तोही गळून पडतो...
आणि जेव्हा तो गळून पडतो...आपल्याला सोडून दूर कुठेतरी निघून जातो....
तेव्हा नकळतपणे डोळ्यातील अश्रू जाणीव करून द्यायला लागतात की....
आपल्यावर झालेल्या त्या बापाच्या आयुष्याच्या खर्चाचा सगळ्यात मोठा तोटा आपल्यालाच झालंय..........
.......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा