क्षितिज.....
....जिथे पृथ्वी आणि आकाश.....म्हणजे धरती आणि आकाश जिथे भेटतात...त्या रेषेला...त्या ठिकाणाला...क्षितिज म्हणतात...
हे एक अस ठिकाण आहे...जे आपण पाहू शकतो... पण तिथे जाऊ शकत नाही...आपण त्याच्या दिशेने चालू लागलो...की तेही हळू हळू पुढे जाते.....खूप खूप धावलो...तरी ते अजून तेव्हढाच लांब असत आपल्यापासून....खर तर धरती आणि आकाश....ही दोन वेगवेगळी टोके आहेत.....धरती ना वर जाऊ शकते....ना आकाश तिच्यासाठी खाली येऊ शकतो.... पण तरीही क्षितिज हा एक असा point आहे..जिथं अस वाटत...ते दोघे भेटलेत ....हा वास्तविक point असतो का....?...क्षितिज ....हा फक्त एक बिंदू आहे जिथे आपल्याला अस भासत की धरती आणि आकाश एक झाले आहेत..... पण खर तर तस नसत ते....
आपल्या आयुष्यात पण असे खूप क्षितिज असतात....जे आपण पाहत असतो....आपल्याला दिसत असतात... पण तसे ते नसतात....
रेल्वे चे रुळ....गाडीची दोन चाके...धरती आणि आकाश ...या काही गोष्टी अशा आहेत....ज्या कधीच एकत्र येऊ शकतं नाहीत....या जर एकत्र आल्या तर यांच्यामध्ये जे विश्व आहे ....त्याच अस्तित्व नष्ट होईल....त्यामुळे निसर्गाने काही गोष्टींसाठी काही निर्बंध लावून दिलेले आहेत...काही गोष्टी दूर राहतील तेव्हढाच त्यांच्यामध्ये समतोल राखला जाईल......
आणि काही गोष्टी अशा असतात ज्या समतोल राखला तरच टिकतात...जशी आपली नाती.....
धरती आणि आकाश लांब आहेत......म्हणून त्यांच्यामध्ये समतोल आहे...धरती तापली की आकाश पाऊस पडतो.....आकाशात काळे ढग आले की धरती त्याला थंड हवा देते....हा समतोल त्यांच्यामध्ये साधला जातो आहे....त्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतं नाही....त्यांना तर भावना नाहीत विचार नाहीत...तरीही ते सगळं सुरळीत चालवतात.....मग आपण भावना असूनही भावनाशून्य ...आणि विचार असूनही...बुद्धिहीन का वागतो.....आपल्याला तर समोरच्याचे विचार...भावना सगळे समजते.....
क्षितिज......ज्याचा अनुभव घेऊ शकत नाही....ज्याला फक्त पाहू शकतो.....
पण भावना आणि विचार...यांचा तर आपण अनुभव ही घेऊ शकतो आणि....व्यक्त ही होऊ शकतो...
मग क्षितिज अबोल असूनही....भावना नसूनही बोलका आहे....
मग आपली नाती....इतकी अबोल का........
...
..
..........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा