सगळ्या गोष्टी मर्यादेत असतात तोवर रमणीय असतात....पण तेथून ओलांडल्या की.....वाहतात....
वाहायला लागल्या की ....वेग येतो....
वेग आवरण्यासाठी.....त्याला झुका व लागतं ...किंवा मग...दुसरे कोणालातरी.....
गाडीचा स्पीड control करण्यासाठी...आपण break लावतो.....एकदम break लागला तर गाडीच थांबते....पण हळू हळू लावलात तर control येतो......किती सोप वाटत ना....पण खऱ्या आयुष्यात अस होत नाही....हळू हळू...थांबवत असतो...स्पीड कमी होत...पण थांबत काहीच नाही....
पाण्यात खडा पडल्यावर...भोवरा निर्माण होतो... पण काही वेळाने तर तोही शांत होतो.....पण माणसाच्या मनाच तस नसत.....खडा पडला तर तो सरळ खड्डाच करतो.....रुतून बसतो....
कधी कोणी अस झाड पाहिलंय का.....त्याची एक फांदी खूप झुकलेली असते.....हळू हळू ती इतकी झुकते.....की जमिनीला टेकते.....आणि जेव्हा ती जमिनीला टेकते....तेव्हा ती तिथून तीच स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करते....म्हणजे तिथून त्या टेकलेल्या फांदीला जमिनीच्या सानिध्यात आल्यावर मुळे फुटतात.....आणि तिथे एक नवीन रोप....तयार होत....
कदाचित तेही शिकवून जात....झुक...झु क...पण मोडून पडू नको....पुन्हा नव्याने उभा रहा...तुझ अस्तित्व निर्माण कर.....
झुकवणारा झुकवतच राहील... तूही झुक् ....पण ज्यावेळी तुला जाणीव होईल की तुझी मुळे तू निर्माण करू शकतोस तेव्हा थांब....आणि पाय रोवयला सुरू कर.....
नवं आयुष्य निर्माण करायला...... वयाच बंधन नसत.....मग ते स्वतःला नव्याने निर्माण करायचं जरी असले तरी......फक्त ईच्छाशक्ती हवी की......इथून पुन्हा उभ राहायचं आहे......
काही झाडांना हे सहज जमतं.......काही झाडं sapport देऊनही......मुळातूनच उपटून जातात.....म्हणून कदाचित कधी कधी support न मिळालेला उत्तम असतो....पण आपण म्हणतो मला support च नाही मिळाला......खर तर ते फुलपाखरु ही जे support शिवाय कोषतून बाहेर येत तेच मजबूत असत.....आणि जे support घेत ते कमकुवत राहत....
....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा