लव्हाळा...
लहानपण देगा देवा /
मुंगी साखरेचा रवा //१//
एरावत रत्न थोर /
त्यासी अंकुशाचा मार //२//
जया अंगी मोठेपण /
तया यातना कठीण //३//
तुका म्हणे बरवे जाण /
व्हावे लहनाहून लहान //४//
महापुरे झाडे जाती /
तेथे लव्हाळ वाचती //५//
शेवटच्या कडव्यात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे...की...मोठं मोठी महापुरे येतात...तेव्हा नदितिरावर असणारी ...जी मोठी मोठी उंच झाडे असतात...ती त्या पुराच्या पाण्याने आडवी होतात... पण लव्हाळा हा असा आहे...जो कितीही पुर येऊ दे...किती दिवसही पाणी राहू दे... पण तो मरत अजिबात नाही...उलट पुराचे पाणी ओसरले की पुन्हा नव्याने उभा राहतो...
त्या लव्हाळा च हेच तर वैशिष्ट आहे...की तो पाणी आले की त्या पाण्यासोबत खाली झुकतो...आणि पाणी गेले की पुन्हा उभा राहतो....
तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगून गेले....की..कधी कधी परिस्थिती...आणि....माणसासमोर....थोड झुकाव ही लागतं....नाहीतर त्या झाडा प्रमाणे जर ताठ च राहिलो....तर...आपण ही कितीही मोठे असू दे...आपल्याला ही जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागणार....
आयुष्य छोटे आहे.... तस तर खूप मोठे आहे.... पण मर्यादित आहे...या आयुष्यात असे खूप प्रसंग येतात आपल्या समोर ...जिथे आपल्याला झुकावं लागतं....
झुकने म्हणजे आपली चूक असणे अस नाही.... पण जर त्या परिस्थितीला निभावून न्यायचं असेल तर...थोड झुकावे ही लागते....लव्हाळा झुकतो...तसच तो पुन्हा नव्याने ताठ पने उभा ही रहातो... पण त्या झाडांचा ताठ पणा च त्यांना घेऊन बुडतो....लव्हाळा वाहून जात नाही तसच रहातो...म्हणजे त्याची मुळे खूप खोलवर असतात म्हणून नव्हे...तो लीन असतो....आजकालच्या या व्यवहारी जगात जर टिकून राहायचं असेल तर लीनता ही प्रत्येकाकडे असायलाच हवी....लीन असणे म्हणजे ...कमीपणा घेणे अस वाटत लोकांना.... पण लीन असणे म्हणजे कमीपणा ...नव्हे...जर आपल्या समोर मोठी लाट आली...आणि आपण म्हणालो मला काय होतय...त्या लाटे समोर आपण ताठ वागलो...तर ती लाट आपल्याला घेऊन जाईल.... पण जर लीन झालो...तर....
आपले महाराष्ट्र चे आराध्य....छत्रपती शिवाजी महाराज.....हे सुद्धा लीन झाले होते....त्यांनी सुद्धा पुरंदर च तह केला होता...२३..किल्ले मुघलांना दिले...म्हणजे कधी कधी परिस्तिथी हातात येण्यासाठी सुध्दा माणसाला लीन व्हावं लागतं....
हीच लीनता आपल्याला एका वनस्पती कडून शिकायला मिळते...लव्हाळा...
लीन होन म्हणजे कमीपणा नव्हे...तर परिस्थिती ल हातात आणण्यासाठी केलेला तो एक तह असतो....जो सगळ्यांना जमलं पाहिजे....
महाराज सगळ्या महाराष्ट्राने पाहिले....त्यांचे वेशभूषा साकारले.... पण त्यांचे विचार....दृष्टिकोन.... बुध्दी चातुर्य....हजरजबाबी पाणा....आणि परिस्तीतिसमोर लीन होन ...आजकाल कोणालाच नाही जमत...लीन व्हायला आंगी कर्तृत्व आणि मोठेपण लागतं...मोठेपण म्हणजे जे आजकाल दाखवलं जातं ते नव्हे....
जिथे महाराज लीन होऊ शकतात....लव्हाळा लीन होऊ शकतो....तिथे आपणही थोड लीन व्हायला शिकायला हवे...
लीन असणे...हेच मोठे आभूषण आहे....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा