आज सकाळी भाजी नीट करत होते.... खरं तर खूप उशीर झाला होता...आणि भाजी खूपच त्रास देत होती...तरीही मी पटपट पटपट आवरायला बघत होते.....जवळपास होतच आली होती....भाजी खाताना छान लागते आरोग्यदायी असते .... पण नीट करताना नको होत...बायकांना समजत असेल हे......असो...ती भाजी लावताना आपण एक बी लावतो...त्याच्यापासून रोप येते मोठे होऊन ती भाजी होते आणि आपण तिला मुळापासून उपसून आणतो...आता हे तर सर्वांनाच माहिती आहे.... पण खर सांगू मला एक गोष्ट समजत नव्हती....जी गोष्ट त्या भाजीच्या बी असण्यापासून ते तिच्या बी येण्या पर्यंतच्या प्रवासात तिच्या सोबत असते....सोबत काय तर तिच्यामुळेच ती भाजी इथपर्यंत च अस्तित्व निर्माण करू शकलेली असते....त्या गोष्टीमुळे त्या भाजीचं पोषण झालेले असते....त्या गोष्टीमुळे च ती भाजी तग धरून असते....टिकून असते...त्या गोष्टी कडूनच तिला सगळ्या गोष्टी पुरवल्या जात असतात.....ती गोष्टच सगळ्यात शेवटी नकोशी असते....त्या गोष्टीचा काही उपयोगच नसतो...शेवटी....ती गोष्ट त्या भाजीपासून बाजूला केली जाते...जस की त्या गोष्टीचा भाजीसोबत काहीही संबंध नाही.....ती गोष्ट म्हणजे भाजीचं निबर देठ आणि मुळे....हो ना...आपल्याला देणं घेणं असत ते फक्त त्या कोवळ्या देठाशी आणि पानासोबत....त्या भाजीच्या मुळ आणि देठा ला आपण किती सहज काढून टाकतो ना.....ते मुळ कुठून कुठून जमिनीतून पाणी अन्न शोषून घेऊन त्या भाजीचं पोषण करत असत....तो देठ ताठ उभा असतो म्हणून त्याच्या मदतीने ते पोषण त्या पानाच्या टोकापर्यंत जात असत....ते जे काम मुळे आणि देठ करत असत ना ते फक्त त्यांनाच माहीत असत....आपण तर फक्त ते वर वाढत जाणार रोप पाहत असतो.....काय कमाल आहे ना....ज्या गोष्टीला खरंच importance म्हणजे महत्त्व द्यायला हवे तिकडे कोणी बघत ही नाही...उलट भाजी परिपक्व झाली की सगळ्यांना ते त्रासदायक वाटतात....त्यांचा खर तर त्यावेळी काही उपयोग नसतोच.... पण त्यांनी ते बी च रोप होईपर्यंत जे केलं ते......त्या रोपाच्या अस्तित्व निर्मितीत त्या मुळ आणि देठच अस्तित्व ......ते कधीच कोणीच विचारात नाही घेतल....आगदी ते रोप ही नाही घेत.....मान्य आहे जेव्हा भाजी पूर्ण तयार झाली तेव्हा त्यांचा खरंच उपयोग नव्हता...नाही... पण....त्यांनी जे बी रुजू झाले ते फुल वण्यापासून ते त्याला परिपक्व बनवण्याप्रंत जे केलं ...त्याची दखल ...त्याची दखल म्हणूनच आपल पण कर्तव्य बनत की....ते उपयोगाचे आत्ता नसले तरी त्यांनी जे केले आहे त्याची जाणीव कायम आपल्या डोळ्यात त्यांच्यासाठी असायला हवी......आणि आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे.....खर तर बऱ्यापैकी जणांना समजले असेल हो ना.....देठ म्हणजे आई जी त्या च पालन पोषण करत असते खंबीर पणे...आणि मुळे म्हणजे बाप...जो दिसत कधीच नाही... पण अस्तित्व ची सुरुवतच त्याच्यामु ळ असते.......आणि आपल अस्तित्व निर्माण करण्यातच त्याच अस्तित्व संपून जाते........
..
.......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा