कधी कधी काही गोष्टींची सल मनात इतकी खटकत असते....की...मन मानायलाच तयार होत नाही की आपण त्यातून बाहेर पडले पाहिजे...... आपण नकळत काही चूक केलेली असते....चूक असते.... अपराध असतो...पाप असत ...काय असत माहीत नाही..... पण मन मात्र त्यातून बाहेर पडायलाच तयार होत नाही....काही गोष्टी व्यक्त करून .....मोकळे होता येत... पण काही गोष्टी अशा असतात...ज्या व्यक्त ही नाही करू शकत...आणि आव्यक्त भावनाच अशा असतात...ज्या कितीही काळ जाऊ दे....त्या मनात साचून असतात....लोक म्हणतात...व्यक्त होन सोप असत. पण मला वाटतं ...अव्यक्त राहण....आणि भावना मनात ठेवण कठीण असत....कारण काही गोष्टींची सल अशी असते ....जी व्यक्त केली तरी झळ लागते...आणि नाही व्यक्त केली तरी झळ लागते......ती लागणारी झळ इतर कोणाला नसते लागतं....ती झळ.....फक्त सोसणाऱ्या लाच लागते....मन तर सर्वांचाच सोशीक असत.... पण झळ लागून जळालेली चामडी जशी व्रण सोडते ....तसच मनाच असत....एक ओरखडा त्याच्यावर कायम रहातो.....लोक म्हणतात वेळ जाईल तसे ओरखडे झालेले भरून निघतात...
खर तर ओरखडे भरून निघतात ... पण सल नाही निघत.....जेव्हा सल नाही निघत...तेव्हा मन शांत राहायला सुरू होत....मन शांत असेल तर आत्मा प्रसन्न असतो अस म्हणतात.... पण जे मन सल घेऊन शांत झालेलं असेल ते प्रसन्न कस असू शकेल....एक सल ....अशांत मन....आणि आनंदी माणूस हे समीकरण असूच शकत नाही.....आनंदी राहायचं असेल तर मन प्रसन्न ठेवा....अस सांगतात.... पण कोणी मन प्रसन्न नसतानाही आनंदात कस राहायचं ......हे कोणीच नाही सांगत....कारण ही गोष्ट तार्किक च नाही ...की मन प्रसन्न नसतानाही आनंदी राहता येईल.....म्हणूनच कदाचित आजकाल आपण आनंदी कमी ...आणि चिंतामग्न जास्त असतो.....भविष्याची सल.....वर्तमानाची सल...भूतकाळाची सल.....आपण सगळ सोबत च घेऊन चाललोय....वर्तमानात जगत तर आहोत... पण भूतकाळाची गाठ सोडू शकलो नाही......आणि भविष्याच्या पतंगाची दोरी ती तर एका हातात सतत आहेच....ती भविष्याची दोरी कधी तुटणार आहे माहीत नाही.....भूतकाळ जो आता हातात ही नाही...निसटून गेलाय....आणि वर्तमानाचा तर एक एक काळ जो भूतकाळ बनत चालला आहे...त्या सगळ्यात आपण इतके मनाला गुरफटून ठेवलंय...की...वर्तमानात जगात आहोत की भविष्यात...की भूतकाळात न निघालोच नाही समजतच नाहीये......
.....
....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा