"खाण तशी माती....आत तशी भाची...
बाप तैसा बेटा....कुंभार तैसा लोटा...."
अशा मराठीतील बरीच म्हणी प्रचलित आहेत....पूर्वी या म्हणी व्यवहारात होत्या...बोलण्यात होत्या.... पण आता फक्त पुस्तकात उरल्या आहेत....एक च वाक्य म्हणी च पण संपूर्ण आयुष्य वर्णन .....
पूर्वी 12बलुतेदार असायचे...18 पगड जाती....
प्रत्येकाचा व्यवसाय ठरलेला असायचा....आणि लोक तेच करण्यात धन्यता मानत....म्हणजे...जस की सोनाराचा मुलगा सोनार...गवळी चां मुलगा गवळी....म्हणजे आजोबा जे करत होते तेच वडील करताहेत...आणि मलाही परत तेच करायचय.....ते बीज त्या शिशु चे मनामध्ये आगदी गर्भास्थ असल्यापासून पेरले गेलेले असायचे.....म्हणजे काय ....पूर्वी ही गर्भसंस्कार व्हायचे.... पण वैचारिक फरक आहे....तेव्हा हा विचार होता ....की जे चालत आलाय तेच चालवायचं आहे..... पण कालांतराने... परिस्थिती सोबत विचार ही बदलले....नंतर हा विचार रुजू लागला की ....जे चालत आलेलं आहे ...ते आता बदलायच आहे....आणि ते आता इतकं बदललं गेलाय ...की पूर्वी कामावरून समजल जायचं....कोणत्या जाती पगड आहेत... पण आता तस नाही....कोणत्याही व्यक्तीला कोणताही बंधन नाही.....की वडिलांनी केलेला व्यवसायच तू केला पाहिजेस.....खर तर ही एक चांगली बाब आहे....परंतु ....कस आहे ज्यांनी व्यवसाय केला आहे...त्यांना नोकरी करणं फार अवघड नाही.... पण ज्यांना व्यवसायाचा आजिबात गंध नाही...ते व्यवसाय कसे करू शकतील....
मला फार deep नाही जायचय....
पण पूर्वीच्या म्हणी व्यवहारात ...बोलण्यात तर नाहीतच.... पण हळू हळू त्या आता पुस्तकांमधून ही जातील अस वाटत आहे....
संत श्री तुकाराम महाराज....संत गोरा कुंभार....संत नामदेव महाराज....
या संतांनी समाजसुधारणेचे खूप काम केले....त्यांनी सहित्ये ही खूप लिहिली....लोकांना शिक्षित बनवलं....ज्ञानाचा प्रसार केला....
त्याच संतांनी हेही सांगितले की...जसे बीज तसे वृक्ष....आणि जसे वृक्ष ...तसे फळ....म्हणजे जर उत्तम फळाची आपेक्षा असेल ....तर बीज ही उत्तमच असावे लागेल.....म्हणजे बीज हे कितपत उत्तम आहे....हे ते बीज कोणत्या वृक्षापासून मिळवलंय ते ठरवत ..हो ना....याचाच अर्थ असा ...की...बीज उत्तम असायला हवे असेल...तर ते ज्या पासून मिळवले जाणार आहे त्या ला आधी उत्तम बनवा....
मग जेव्हा मिळालेल्या बिजाच रोपण होईल तेव्हा फळे ही उत्तम च मिळतील....
प्रत्येक सजीव गोष्टींमधे ....एक गोष्ट अशी असते ...जी त्यांना genetically मिळालेली असते....जस की आपण पाहतो....वाघाला कोणी शिकवत नाही की शिकार कशी करायची....माश्याला कोणी शिकवत नाही की कस पोहायच.....तसच आपल्या मनुष्यामधेही आहे....प्रत्येकामध्ये एक गोष्ट अशी असते जी....genetically आलेली असते....फक्त आपल्याला माहीत नसत....
काही गोष्टी समजायला time लागतो ... पण जेव्हा समजतात....तेव्हा time लावून चालत नाही....
कुंभार जेव्हा मडक घडवत असतो ....तेव्हा त्याला हे नसत माहीत की...त्या मडक्यात काय ठेवलं जाणार आहे.....तो त्या प्रत्येक मडक्या ला तितक्याच कष्टाने बनवत असतो....प्रेमाने आकार देत असतो....माती एक च असते...बनवणारा ही एक च असतो.... पण सगळेच मडके पाण्याला थंड नाही ठेऊ शकतं.....
माती ला आकार देणं सोप नसत..... पण आकार दिलेल भांड ....भरताना मात्र काळजीपूर्वक भराव लागतं ....कारण गरम चहा ओतला की तापणार... आणि थंड पाणी ओतलं की त्याला थंड ठेवणार तेच असत.....फक्त आपल्याला समजायला हवे की....रिक्त भांड भरायच कशाने आहे.....
एकदा भरलेलं भांड पुन्हा रिक्त करता येत... पण जे त्याला चिकटत ते सहजा सहजी नाही निघत....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा