काही प्रश्नांना उत्तरे नसतात....तर बरीच उत्तरे नवीन प्रश्न निर्माण करतात.... उत्तराना प्रश्न पडणं possible आहे... पण प्रश्नांना परत प्रश्न का पडतात... खरें तर प्रश्न बघून उत्तर दिलं जातं.... पण त्या उत्तरातूनच एक नवीन प्रश्न तयार होत असतो....कदाचित उत्तर हवे असेल तर प्रश्नांना समजून घ्यावे लागेल ... पण कधी कधी....प्रश्न समजून ही उत्तर नाही समजत...मग काय उपयोग त्या उत्तरांचा.....
पुढे काय होणार आहे.... माझ भविष्य काय.... माझ आयुष्य किती....असे काही प्रश्न असतात...ज्यांची उत्तरे ही गूढच असतात....कधी कधी उत्तरे ठाऊक असतात... पण प्रश्नांचा विसर पडतो.... विसरणारे प्रश्न आणि आठवणारे उत्तर यात साम्य शोधतो पण link लागत नाही....कदाचित लिंक लागते पण यात लिंक कशात आहे ....हेच विसरतो...link लावता लावता लक्षात येत की...आपण कुठेतरी दूर आलोय....जवळ जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल...short cut टिकत नाही...आणि long cut साठी time नसतो....दूर दूर आल्यावर झालेली जाणीव ही चुकीचेच असते.... unfortunately त्याचा उपयोगच नसतो....लवकर झालेली जाणीव ..and राहिलेली उणीव भरून काढली की... पश्र्चाताप होत नाही.... पश्र्चाताप ही जाणीव झालेल्यांना होतो....त्यामुळे जाणीव होण्याआधीच उणीव भरून काढणे कधीही चांगलेच....मुळात काम करत असतानाच त्यात उणीव ठेऊ नये...ते पूर्णपणे करावं....पूर्ण केलेली कामे ही कधीही चांगलीच...
चांगली कामे केली की अडचणी येत नाहीत....and yes....अडचणी या चांगली कामे करणाऱ्यांनाच येतात.....त्यांच्याशी fight करायला शिकल पाहिजे......जे शिकतोय ते शेवटपर्यंत घेऊन जाईल याचा विश्वास पाहिजे....विश्वास ठेवला तर परत आपल्यावर ठेवला जातो....
कधी कधी ना कळतच नाही...नकळत भरकटत असतो आपण...त्या मनाच्या भरकटण्यातही कदाचित logic असावं....
कारण काहीतरी logic असल्याशिवाय magic घडूच शकत नाही.....
हजारदा सांगूनही एखादी गोष्ट घडते तीही सारखीच...मग त्या गोष्टीला काय म्हणावं..
घडव्याशा वाटणाऱ्या गोष्टीचं आयुष्य थोडाच असत...काही घटना घडण ...टाळू शकतो... पण काही हातातच नसतात....कारण त्या out of coverage असतात....
आणि जे हातात नसत ...त्याच्या मागेही धावू नये....कारण धावता धावता जर ठेच लागली...तर वेदनाही आपल्यालाच होणार आहेत...आणि..काही वेदनांना मलम नसतं..... पण कधी कधी.....एक मायेची फुंकर काम करून जाते.....
फक्त फुंकर घालणारी मायेची माणसं भोवती असायला हवी.....खर तर मायेची माणसं भोवती असली की फुंकर घालायची वेळच नाही येत....
असो....
मी पण बोलता बोलता खूप भरकटे ना....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा