अस म्हणतात लोक....जो भावनाशून्य असतो....तो अतिशय व्यवहारी असतो....आणि तो व्यवहारी असतो म्हणून तो भावनाशून्य असतो.....खर तर भावना ज्या मनुष्यामध्ये नाही....तो मनुष्य च असू शकतं नाही....कारण जेव्हा या देहाची निर्मिती झाली तेव्हाच....विचार ...आणि भावना ....या दोन्हींची ही निर्मिती सोबतच झाली....मनुष्य विचारांच्या आधीन असेल तर तो व्यवहारी असतो....आणि भावनांच्या आधीन असेल तर तो भावनिक असतो....मेंदू आणि हृदय....हे दोन्ही अवयव सगळ्यांच्या शरीरामध्ये त्याच जागी असतात....आणि त्यांचं कार्य ही प्रत्येक मानुष्यामध्ये सारखेच असते....
अस म्हणतात ज्यांचा मेंदू तरबेज असतो लोकांना ओळखण्या मधे ते कधीही भावनेच्या दुनियेत धोका नाहीत खात..खर सांगायचं तर जेव्हा भावना ...व्यक्त होत असतात...आपल्याकडून ...किंवा इतर कोणाकडून ...तेव्हा तिथे हृदय तर कार्यरत असत च .... पण त्या भावनांना मार्ग मेंदू च देत असतो....
आपल्या आवतिभोवती आपण पाहतो....प्रत्येक रंगाला सुद्धा प्रत्येक एका भावणेशी जोडल गेलं आहे....जस की लाल रंग प्रेमाचा.... पांढरा...शांततेचा.....केशरी रंग त्यागाचा.....हिरवा रंग मानव आणि निसर्गाच्या एकतेचा.....हे रंग आणि यांच्या मागच्या भावना हे फक्त मेंदू ल माहीत असतात ...हृदय ल नाही..... पण त्या व्यक्त करताना भावना हृदयातून येत असल्या तरी पूर्णत्वास मेंदू नेतो....म्हणजे काय ....तर माणूस फक्त विचारांसोबत नाही जगू शकत....त्याला भावनांची साथ ही असावीच लागते.....कोरड्या पडलेल्या शेतात जर हिरवळ आणायची असेल तर तिथे आधी पाणी आणावं लागतं.....नंतर तिथे हिरवळ आपोआपच येते....एकदा जर तिथे पाणी आणि हिरवळ आली ...की मग कितीही उन्हाळे येऊ देत....तिथली हिरवळ कमी होईल पण नष्ट नाही....
भावनाशून्य लोक...असूच शकत नाहीत खर तर.... पण भावनांना दाबून ठेवणारी खूप असतात....त्यांना वाटत भावना दाबता येतात मला म्हणजे ...मला त्यावर control करता येतं...... पण टस नसत ते...तो त्या भावनांना दाबतो दाबतो..आणि..एक दिवस असा येतो की त्या भावना....त्या जागेत बसेना श्या होतात...आणि बाहेर पडायला मार्ग शोधायला सुरू करतात.... पण तेव्हाही जर त्यांना दाबल गेलं....तर एके दिवशी असा विस्फोट होतो ...की ती व्यक्ती कितीही मेंदू वर मनावर control ठेवणारी असेल...ती व्यक्ती तो विस्फोट नाही झेलू शकतं....म्हणून....म्हणतात....जो ज्या मार्गाने जात असतो...त्याला त्या मार्गाने जाऊ द्यावे....जर अडवणूक झाली......तर तो कोणत रूप घेईल आणि कोणत्या मार्गाने बाहेर पडण्यासाठी झटपटेल नाही सांगता येत...म्हणून आपणही शरीरातील natural things जे असतात....जे ज्या मार्गातून येत असतात ते त्यावेळीच बाहेर काढून टाकतो...जर नाही काढले तर ते विषारी आणि घातक बनतात..आणि नुकसान करतात.....तेच शरीर शिकवत .....जस मी रोकत नाही ....मार्गात अडवत नाही...तसच तुम्ही ही मोकळे व्हा...मोकळे करा....आणि कोणाच्या मार्गात अडवणूक तर नक्कीच नका करू.......
कारण जर हृदय आणि मेंदू हातात हात घालून गेले तरच...समतोल आहे....नाहीतर मग.....मेंदू ल depression आहे....आणि हृदयाला heart attack.......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा