काही गोष्टी खूप प्रेरणादायी असतात.....काही खूप मन हेलावून सोडणाऱ्या असतात....निस्वार्थ जीवन जगावे....सांगणं खूप सोप असत..... पण जिथे आपल्या जन्माची सुरवात च स्वार्थाने झालेली असते....तिथे जीवन निस्वार्थी कस असू शकेल.....रोप लावल तरी ...ते आपण लावताना आशा धरून असतो की हे मला चांगली फळे देईल किंवा फुले देईल......कोणतीही वस्तू घेताना आपण पाहतो की ती कितपत माझ्या फायद्याची आहे.....विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टीतही देनाऱ्याच स्वार्थ असतो....खर तर स्वार्थ म्हणजे.... स्व... अर्थ.... स्व म्हणजे सर्वस्व...म्हणजे आपण स्वतः.... स्व म्हणजे स्वयंभू.....स्वयंभू..... तसच जर पहायचं झालं तर...संत पूर्वी प्रवचने देत असत...कीर्तन करत असत.....त्यामागे सुद्धा त्यांचा एक स्वार्थ असायचा...की लोकांनी शिक्षित व्हावं ...त्यांचं आज्ञान दूर व्हावं.....ह्या स्वार्थी विचाराला निस्वार्थ सेवा म्हटल जात कारण....त्यात आहित कोणाचं नव्हत....
खरं तर लोक म्हणतात ज्याला संसार करायचंय त्याला स्वार्थी व्हावच लागतं....आणि ज्याला परमार्थ करायचंय तो संसार नाही करू शकत.......म्हणजे परमार्थ साधत असताना स्वार्थ नाहीसा होतो.....
म्हणजेच स्व च अस्तित्व संपत...म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा विसरपडून....म्हणजे स्व ल विसरून.....जेव्हा आपण एक निर्विकार होतो....म्हणजे परमार्थी होतो ....मग तेव्हा तो व्यक्ती जो स्व ला विसरला आहे...तो संसार तरी कसा करेल....म्हणून कदाचित संत म्हणून गेले की...परमार्थी लोक संसार करू शकत नाहीत...आणि स्वार्थी लोक.....परमार्थ.....
असो....
आनंदाच्या शोधत असताना....आपल्याला अनेक गोष्टी सापडतात.... पण त्या रस्त्यात कधी स्वार्थ नाही सापडत.....जो आपल्याला कुठेच सापडत नाही... पण तो सदैव आपल्या स्व मधे असतो....स्वकीय...स्वहित वादी....स्वावलंबी.....या सगळ्यांमध्ये जो स्व आहे.... म्हणजे ...आपण ...म्हणजे मी....तोच स्व स्वार्थ मधे सुद्धा असतो......फरक फक्त इतकाच आहे....की स्व जोडला कोणासोबत जातोय.....
असे कितीतरी मराठी शब्द आहेत आपले...जे आपण बोलतो...आगदी सहज.... पण त्या शब्दामध्ये किती गहनता आहे...हे आपल्याला माहीतच नसत....
मराठी बोलण खूप सोप आहे अस म्हणतात.... पण मराठी समजून घेऊन बोलण खूप आवघड आहे...म्हणून पूर्वी लोक म्हणायचे...शब्द आपले आहेत जीभ ही आपली आहे... पण बोलताना विचार करून बोलावं...कारण निघणारे आर्थ हे आपल्या हातात नसतात.......
म्हणून आत्मचिंतन ....म्हणजे स्व चिंतन केल्याशिवाय बोलू ही नये....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा