रोज सकाळी जसा सूर्योदय होतो....तसा सायंकाळी सूर्यास्त ही होतो.....सूर्योदय होतो....म्हणजे सूर्याचा उदय होतो.....रोज रोज तर तोच सूर्य येतो ना... मग....त्याला रोज रोज नव्याने उदय झाला अस का म्हणायचं.....रोज असतो तोच.... पण येतो नव्या ऊर्जेने ... चेतनेने.... प्रकाशाने... काल येऊन गेला होता म्हणून आज थोडा कमी..आणि उद्या त्यापेक्षाही कमी नाही येत तो.....रोज नव्याने येतो....म्हणून रोजच त्याचा उदय असतो....तसच तो अस्तास ही जातो....तो येतो तेव्हा ऊर्जेचा संचार होतो... पण तो अस्तास जातो...तसच....आपलीही ऊर्जा सायंकाळी थोडी कमी होऊन जाते... पण उद्या पुन्हा आपणही त्याच ऊर्जेने उठतो.....हो ना....ना ऊर्जा भिन्न आहे...ना कार्य....स्वतः ऊर्जेने परिपूर्ण राहून इतरांना ही....ऊर्जा देत राहण हेही हाच तर सांगतो.....
पण जर त्याच्याकडून मिळणारी ऊर्जा जास्त झाली...किंवा आपण ती जास्त वेळ घेतली तर दोन्ही हानिकारक च आहे.....ऊर्जेचे वहन कमी कडून जास्त कडे अस नाही होत....ते नेहमी जास्त कडून कमी कडे होते.....आपल्याकडे एखादी गोष्ट जर जास्त असेल तर आपण संग्रह करतो....मनुष्य प्रवृत्ती आहे ती.... पण निसर्ग शिकवतो...जर जास्त असेल तर ते कमी असनाऱ्याना द्या.....ज्याला त्याची गरज आहे तो ती घेईल...ज्याला गरज नाहीये.....तो त्यापासून दूर राहील.....सूर्य प्रकाश सर्वांना समान देतो.... पण तरीही काही झाडांची पाने ही हिरवी असतात ...तर काही....कमी असतात...देणारा तेव्हढाच देत असतो... पण घेणारा कितपत घेतोय...हे देणाऱ्याला ही माहीत नसत.....म्हणून देणारा कधी दूजाभाव करत नाही.....आपण फक्त घेणे शिकलो ...आणि ते इतरांना देणे....हे विसरूनच गेलो....इतरांकडून आपण घेतलेली वस्तू आपण त्यांना परत देऊन टाकतो....हा व्यवहार झाला.... पण आपल्याजवळील एखादी वस्तू...जीची समोरच्याला गरज आहे ती त्याला न मागता देणे...आणि परतीची आपेक्षा न करणे ही दानत झाली....जी निसर्ग शिकवत असतो.....आयुष्य मर्यादित आहे.....जन्माला आलेला प्रत्येक जीव एका वर्तुळात राहून जगात असतो....ते वर्तुळ त्याने आणि त्याच्या आजूबाजूच्या समाजाने आखून दिलेले असते....त्या वर्तुळात जोपर्यंत तो जीव असतो ...तोपर्यंत तो सन्माननीय असतो..... पण जर त्या जीवाने तो वर्तुळ भेदण्याच प्रयत्न केला तर तो देशद्रोही.....समाज बहिस्कृत ....होतो....जन्माला येताना सीमा घेऊन येत नाही.... मरताना सीमा नसते.... पण आयुष्यभर...आपल्याला एका सिमेत आयुष्य काढावं लागतं......बंधन आणि बंध यामध्ये खूप आंतर आहे...हे आंतर समजण्यात आपल वर्तुळ पूर्ण होत...आणि आपण त्या वर्तुळाच्या बंधन रुपी बंधा मधे सीमित आयुष्य जगून वर्तुळातून च मुक्त होतो.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा