पावसाअभावी शेतकरी पेरणी लवकर करत नाही.......परिणामी पिक मागास होतात.....मग वाट बघून शेवटी शेतकरी पेरणी करतातच... पण निसर्गाचं चक्र कधी कोणाला कळलय.....जेव्हा पेरणी होते...आणि बीज अंकुरणार असतो... कोंबातून बाहेर येणार असतो ....तेव्हाच धो धो...पाऊस पडतो.....एक दा नाही दोनदा नाही...खूपदा....आणि तो बहरून...फुटून....बाहेर येणारे जे कोंब असतात....ते तिथेच दडपतात...आणि ...आतल्या आत जमिनीत कुजून जातात...तो बहरणारा अंकुर ....कोंब म्हणून जन्माला येणारे बीज....जन्माला येण्याआधीच दडपून जात......त्याच अस्तित्व आत्ता सुरू होणार असत.... पण ते सुरू होण्याआधीच.....दडपून जात.....ते कितपत फळ देऊ शकाल असत....ते कितपत त्या शेतकऱ्याला समृध्द केलं असत...हे सगळं समजण्या आधीच त्याच अस्तित्व संपलं.....त्याला निसर्गाने संधीही नाही दिली की अस्तित्वात यायची आणि कर्तृत्व दाखवायची.....
दडपण......
निसर्ग ही हेच सांगत असेल का....कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला....तर तो अतिरेक दुसऱ्यांसाठी दडपण होऊ शकतो.....त्याला नसत माहीत....काय योग्य आहे...काय नाही...आपण कितपत बरसायला हवं..... पण तो बरसतो...त्याचा हेतू नसतो दडपवण्याचा...... पण समोरचा त्याचा अतिरेक सहन नाही करू शकत आणि त्याच्यात दडपणाची भावना जागृत होते....
निसर्ग सांगत असतो... पण आपण समजू शकतं नाही.....आपल्यामुळे ही आपण कितीतरी लोकांना दाडपणाची भावना देत असतो....आपल्याही नकळत....जर एखाद बीज अंकुरित होणार असेल तर त्याला पोषक वातावरण निर्माण करून देण्याऐवजी आपण ही जर निसर्गा प्रमाणे अवेळी बरसायला लागलो....तर ते बीज अंकुरण्याढीच कुजून जाईल....आणि एकदा का ते बीज दडपले आणि कुजले तर ते आपल्या कोणत्याच कामी येत नाही.....ना ते स्वतः विकसित होऊ शकते ना स्वतः मुळे दुसऱ्यांचा विकास करू शकत....
निसर्ग कधी कधी शिकवण देण्यासाठी अस वागतो.... पण आपण नाही शिकू शकलो तर आपल दुर्भाग्य....एखाद्या बिजमध्ये .....कितपत फळ देण्याची क्षमता आहे हे आपण वरून नाही ठरवू शकतं....त्यासाठी त्याला आपल्याला पेराव लागेल..आणि पोषक वातावरण निर्माण करून ते कितपत फळ देत आहे हे पाहावं लागेल...तरच आपलाही विकास होईल आणि त्या बीजाचा ही......
दडपण कोणत्याच भावनांना विकसित होऊ देत नाही.....ना शारीरिक विकास होतो ना मानसिक.....
म्हणून दडपण कोनवरच ही असो...आपण दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.... पण जर अस करू शकत नसलो तर स्वतःहून ....कोणावरही दडपण आधिकार आपल्याला तर कोणीच दिलेला नाही.....
दडपण ना निर्गासाठी योग्य आहे ना आपल्यासाठी.....
म्हणूनच असा पाऊस कधीच बरसवू नये...जो पिकाला जोम देण्याऐवजी त्याला दडपून टाकेल....
निसर्गात ही आणि आपल्या आयुष्यातही....
अतिरेक दडपण आणतो...आणि दडपण......खुंट......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा