शिरवळ....
रखरख त ऊन.....असत....आजूबाजूला एक ही झाड नसत...आणि अचानक कुठूनतरी....एक ढग सावली घेऊन येतो....अस वाटत ...तो आपल्यासाठीच आलाय....त्या उन्हात ती थोड्या वेळासाठी ची जी सावली असते...तीही खूप थंडावा देऊन जाते..... रख रखं करणार मन....आणि शरीर थोड्या वेळासाठी का होईना शांत होतात.....
आपल्या गावाकडे त्याला शिरवळ म्हणतात.....
जी लोक शेतात काम करत असतात....त्यांना ती शिरवळ म्हणजे अमृततुल्य असते.....काम ही जलद होते...आणि चटके ही कमी बसतात... उन्हाचे...
ती सावली सगळीकडे नसते...काही भागा पुरतीच असते...आणि काही वेळासाठी....... पण तरीही ती शिरवळ हवी हवी शी असते....जेव्हा रखं रखणाऱ्या उन्हात ...घामाच्या धारा येत असतात...आणि जवळ कशाचाच सहारा नसतो....तेव्हा ती थोड्या वेळासाठी आलेली सावली ......खूप समाधान देऊन जाते....
आजकाल अशी शिरवळ पाहायला मिळत नाही....अस म्हणतात....खर तर ती शिरवळ पाहायला आम्ही रखरखणाऱ्या उन्हात ही कधी असतो.....
निसर्ग सुध्दा खूप माया करत असतो.... पण आपण कधी अनुभवत च नाही.....जो देतोय त्याच्याकडून आपण घ्यायला कमी पडतोय....आणि जे देण्यास असमर्थ आहेत....त्यांच्या कडे आपण डोळे लावून बसतो.....
नात्यातली शिरवळ सध्या कुठेच मिळत नाहीये.....खूप गरज आहे सध्या त्या शिरवळ ची नात्यांना.....बांधून ठेवण्यासाठी....रख रखत असणाऱ्या काही नात्यांना शांत करण्यासाठी.... पण हरवत चाललेली शिरवळ कुठे आहे काय माहीत......
जिथे आहे तिथे कदाचित त्या शिरवळ ची गरज आणि किंमत दोन्ही नाही...आणि जिथे गरज आहे.....तिथे ती शिरवळ च नाही....
अस एक शिरवळ च नात जपणार व्यक्तित्व असावं जे... नात्यातला गारवा जपेल....जेव्हा ऊब आणि शांतता....प्रेमाने देईल......निसर्ग आपला कोणी नाही....खर तर अस म्हणणं चुकीचं होईल पण तरीही......तो आपला कोणीही नाही....आपण त्याच्यासाठी काही ही नाही करत पण तरीही तो आपल्याला सतत देत असतो....कधी ऊन कधी पाऊस...तर कधी शांतता आणि प्रेमाच्या छयेची ऊब
मग आपण माणूस असून माणसांना शिरवळ का नाही देऊ शकतं....कधी कधी गरज असते.....
कधी गरज नसते ही....... पण जेव्हा गरज असते आणि ही शिरवळ ची छया आणि गारवा दोन्ही मिळते तेव्हा समाधानाने आणि प्रेमाने...ती नात्याची वेल ही बहरात जाते.... पण तो शिरवली चां गारवा देण्यासाठी एकाला रखरखणारे ऊन झेलावे लागेल.... पण आजकाल ते ऊन झेलण्यासाठी कोणीच तयार नाही...सर्वांना फक्त आपेक्षा आहे ती शिरवळ ची....निसर्ग त्याच आणि आपल नात जपण्यासाठी सदैव तत्पर असतो..... पण आपण ना निसर्गाशी प्रामाणिक नात जपू शकलो.....ना आपली माणुसकीची नाती.....
शिरवळ तर सगळ्यांनाच हवीय..... पण ती देणार कोण.....
शिरवळ काही काळापुरती च असते....देनाऱ्यसाठी ही आणि घेनाऱ्यसाठीही....... ऊन सावलीचा खेळ....
पण घेणार कोण ...आणि देणार कोण.....
घ्यायला सगळेच आहेत.... पण द्यायला.......
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा