इंद्रधनुष्य....
Rainbow....
पाऊस पडुन गेल्यानंतर जेव्हा परत एकदा ऊन पडतं.....तेव्हा हा इंद्रधनुष्य दिसतो....निसर्गाचा एक चमत्कार.....पाण्याच्या थेंबावर जेव्हा सुर्याची किरणे पडतात ...तेव्हा आपल्याला आभाळाच्या पडद्यावर...हे इंद्रधनुष्य पाहायला मिळतं....7colour असलेली एक धनुष्याकृती प्रतिमा.... याच्यात फक्त पाण्याचं थेंब आणि सूर्याचा एक किरण ...दोघेच असतात....आणि दोघे मिळून एक चमत्कार घडवून आणतात जो फक्त पाहत बसावस वाटतं.....scintifically बघायचं झालं तर ...तिथे तीन phenomenon घडून आलेले असतात....reflection...refraction ... आणि dispersion....
एका medium मधून दुसऱ्या मधे जाण....जाताना नम्रपणे वाकून जाणे...आणि पुन्हा तिथून बाहेर पडताना...आपल्यासोबत खूप सारे रंग घेऊन बाहेर पडणे......जे आपल्याही आयुष्यात colour आहेत याची जाणीव करून देत...आणि ते colour दुसऱ्यांना ही दिले पाहिजेत हेही दर्शवत.....
किती अद्भुत आहे हा संगम......जाताना तर गेलेली एक white म्हणजे पांढरी light.... पण जेव्हा बाहेर पडली तेव्हा स्वतःसोबत...खूप सारे रंग घेऊन आली....
हा phenomenon घडण्यासाठी.....ना वेळ शुभ लागते ...ना काळ....फक्त पाऊसाचे थोडेसे थेंब येऊन गेले की.....ही जादू घडते....
खर तर हा एक पूर्ण गोल असतो.... इंद्रवज्र.... पण तो क्षितीजमुळे आपण पाहू शकत नाही..... पण आपल्या महाराजांच्या गड आणि किल्ल्यावरून....खूप जणांनी हा इंद्रवज्र पाहिलं असल्याची पावती ही दिलीये...एक क्षितिजसमंतर गोलाकार तोही सात रंगांचा.....जेव्हा तो एखादी व्यक्ती पाहत असते तेव्हा तिचे शीर्ष....म्हणजे डोकं हे बरोबर मध्यभागी दिसत असत.....
खूप स्वर्गीय आनुभव असेल हा.....ज्यांनी पाहिलंय त्यांच्यासाठी.....
निसर्गातले हे चमत्कार पाहण्यापेक्षा आणि स्वर्गीय आनंद मिळविण्यापेक्षा....आपण.....एका अवास्तव .... काल्पनिक गोष्टीमध्ये आनंद शोधत फिरत असतो ...जो आपल्याला कधीच मिळत नाही....आणि मिळालं तरी क्षणिक असतो.....
इंद्रधनुष्य...स्वतःमध्ये सात colour सामावून असत.... पण जेव्हा ते आभाळाच्या पडद्यावर दिसत....तेव्हाच त्याची शोभा वाढते..... स्वतःच्या आयुष्यातले रंग दुसऱ्यांना देणं..आणि त्यांच्याकडूनही आपण काहीतरी रंग घेणं.....आणि त्या रंगांमध्ये रंगून जाण...ही भावनाच वेगळी असते......आपल्या सगळ्यांकडे त्या white light ray प्रमाणे....सगळे colour असतात....दिसत फक्त white असतो.. पण सामावलेले सात रंग हे अदृश्य असतात...ते दिसून येण्यासाठी.....हा इंद्रधनुष्य सारखा चमत्कार च व्हावं लागतो.....जर निसर्ग रंग भरण्याची प्रेरणा देत असेल...तर आपण असे....कोरडे का....?.....जर आभाळ तले रंग आपल्याला एव्हढा आनंद देत असतील...तर माणसांनी माणसाला दिलेले रंग ....किती आनंद देतील.......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा