रोप ....
काल सहज बागेत फिरत होतो बाहेर...तेव्हा पाहिलं...एक हिरवेगार...लुसलुशीत ....गवताचा कोंब हळूच जमिनीतून वर आलेला होता....खूप छान दिसत होत.....आजूबाजूची जमीन थोडी थोडी बाजूला सरत होती ....आणि तो गवताचा कोंब त्याच्या मानेवर मातीच थोड ओझ घेऊन जमिनीतून बाहेर आलेला......त्याला त्या मातीच ओ झ होतय अस नव्हत वाटत....उलट ...त्याने त्या मातीला किती सहज पेलून धरलाय अस वाटत होत....खूप च कोवळ...नाजूक होत ते....अशा या नाजूक जीवाला त्या मातीतून बाहेर येताना ची जी process होती त्याचा त्रास अजिबात नव्हता वाटत....उलट ते जोमाने बाहेर येत होत... तेव्हढा जोम...कस...त्या जमिनीने ही त्याला दिला होता.....ते जणू अलगद बाहेर येतय....
ते कुठं उगवले आहे...त्याच्या भोवती काय आहे....कोणती रोपे आहेत.... कसल वातावरण आहे...त्याला यातल काहीच माहीत नव्हत....
पण त्या जमिनीला माहीत होत....हे रोप कुठे जन्म घेतय...याच भविष्य काय असणार आहे....तिला हे सगळं माहीत असूनही तिने त्या रोपाला तिच्या उदरात असताना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पुरवल्या....आणि त्याला अलगद पने ....बाहेर आणले.....
ते रोप होत एक छोटंसं फुलाच.....आणि ते ज्या ठिकाणी उगवल होत ...कदाचित ते तिथं नव्हत राहणार......कारण ती एक बाग होती....आणि जिथे बाकीची फुलांची झाडे होती...तिथेच त्यालाही लावल जाणार होत.... पण ही गोष्ट त्या रोपाला माहितीच नव्हती....ते किती आनंदाने ...ताकदीने....उत्सुकतेने बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते....
त्याला जेव्हा समजेल की आपल अस्तित्व इथे नाहीये...जिथे आपला जन्म झाला ..तेव्हा त्याला काय वाटेल....ते ज्या मातीत रुजू व्हायला बघत आहे...त्या मातीतून ही त्याला काढलं जाणार आहे....दुसऱ्या मातीत त्याला रुजू व्हायला पुन्हा तोच कस लावावा लागेल....
आणि जर रुजू नाही झाले तर....त्याचे आयुष्य तिथेच थांबेल....
आपण कितीतरी झाडे एकडून काढतो तिकडे लावतो...तिकडून काढतो....कुठे दुसरीकडेच लावतो...आणि आपण किती confident असतो की ते आता येणारच...त्याला खत देतो...पाणी देतो...
रुजू होन हा एकच पर्याय असतो त्याच्याकडे...जर रुजू नाही झाले....तर त्याच आयुष्य संपेल...pn आपल्याला फरक नसतो पडणार...आम्ही ती जागा परत दुसऱ्या रोपाने भरून टाकतो.....या सगळ्यात एकाच गोष्टीचे तुकडे पडत असतात...ते म्हणजे जमिनीचे.....ती सगळं पाहत असते... पण काहीच करू शकत नसते....ज्यांच त्यांचं कर्म...अस म्हटल जात ....आणि ....
आपणही त्या रोपप्रमाने जर परिस्थिती नुसार स्वतःला बदलवत नाही गेलो...तर आपल ही अस्तित्व निर्मिती तिथेच थांबेल......
माती बदलेल ...खत बदलेल....जागा बदलेल.... पण आपली जगण्याची इच्छा ...आणि संघर्ष करून टिकून राहण्याचा स्वभाव....कोणी नाही बदलू शकतं....तोच आपल्याला टिकवून ठेवेल.....
लोक रोपाला तिथे लावतात जिथे त्यांना ते चांगल वाटत असत...तिथे नाही....जिथे त्याला सकस वाढता येईल.........
अस असत......तर एका ट्रे मधील ...शेतात लावली जाणारी सगळीच रोपे जगली असती....... पण त्या ट्रे मधील तीच रोपे जगतात जी तग धरून राहतात....आणि ती कोमेजून...सुकून जातात....जी तग धरून ....राहू शकत नाहीत.....
I hope...... I give some positive......
....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा