पाणी म्हटल की आठवत ते म्हणजे प्रवाह....
जे वाहत असते...खळखळ त असते....वाट काढत पुढे जात असते....ज्याला पुढे जाण्यासाठी स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करावा लागतो....जेव्हा तो मार्ग निर्माण करतो ...तेव्हा तो मार्ग प्रवाह बनतो....ते पाणी प्रवाह निर्माण करून पुढे पुढे जात च असत.... पण सोबतच बाकीचे छोटे मोठे प्रवाह ही त्याला भेटतात.....आणि तो प्रवाह....वेग तर घेतोच पण पात्र...जागा ही व्यापत जातो....मग त्याला एक विशिष्ठ ओळख दिली जाते...त्यावरून त्याची गणना होते....पाण्याला ना आकार असतो...ना रंग ...ना चव....
आपल्याला जर भूक लागली तर आपण काहीही खाऊन भूक भागवू शकतो.... पण जर तहान लागली तर....एकमेव पाणीच आहे जे आपली तहान भागवू शकते....
आपण जेव्हा जन्माला येतो ...तेव्हा आपणही एक मोकळं पाणी असतो....
आपल्याला प्रवाह मिळतो...आणि आपण वाहत जातो.....
प्रवाहात वाहत असतो तोवर ठीक असत.... पण प्रवाह आणि पात्र सोडून जर दुसरीकडे गेलो....तर त्याला पूर म्हणतात......जो सगळ्यांसाठीच चांगला नसतो...म्हणून पाण्याने पात्रात आणि प्रवाहात राहिलेले चांगल असत....हेच तर शिकवतो आपल्याला हा निसर्ग पात्रात आणि प्रवाहात रहा...प्रवाह तुम्हाला पुढे नेत राहील...आणि पात्र जाणीव करून देत राहील ...आपल्याला कोणत्या जागेतून प्रवाह न्यायचा आहे.....
पाऊस ....एखाद्या वर्षी खूप पडतो....खूप पाणी वाढत प्रवाहात...आणि पात्रात....त्यावेळी त्या प्रवाहाला त्या पाण्याला आपल्यासोबत नेण कठीण होत...मग ते वाढलेले पाणी..प्रवाह सोडून ... पात्रातून बाहेर येत....त्याच बाहेर येणं त्याच्यासाठी ही चांगल नसत आणि....त्या वाहत जाणाऱ्या प्रवाहासाठी ही....
ते पाणी बाहेर येत आणि....सगळी नासधूस करत....
आणि पुन्हा त्याला पात्रात जाता ही येत नाही.....कारण त्याचा प्रवाह वाढलेला असतो.....तो प्रवाह या पाण्याला कधाचीत घेऊच शकत नाही सोबत.....
मग ते पाणी प्रवाह आणि पात्र दोन्ही सोडून भरकटत असत....ते ना स्वतःच विकास करू शकत ना त्या प्रवाहासोब त जाऊन दुसऱ्यांचा.....
त्याचा उल्लेख.....आता वेगळ्या पद्धतीने केला जातं असतो....त्याला त्या पात्रा मुळे जी विशिष्ठ ओळख मिळालेली असते....तीही ते हरवून बसते.....म्हणून म्हणते निसर्ग आपल्याला खूप काही ...खूप छान गोष्टी शिकवत असतो ... फक्त आपण दुर्लक्ष करतो....
पाणी तर हेच शिकवून जाते.....प्रवाहात रहा.....पात्र सोडून भरकटू नका......जे वळण घ्यावं लागतं ते घ्या...ज्या भांड्यात जातोय त्याच भांड्याचा आकार घ्या.....कारण ओतनारा त्याच आंदाजने ओतत असतो की हा कोणत्या भांड्यात बसेल.....
जर त्या भांड्याचा आकार आपल्याला घेता आला तर....
निर्विकार......
ना गुण...ना रूप...ना रंग...ना चव.....
काहीच बदलत नाही...बदलायच ते फक्त आकार.... भांड्यानुसार.....
आता आकार म्हणजे काय ?.....
तर परिस्थितीनुसार माणूस बदलतो...हे तर माहितीच असेल...तोच बदल म्हणजे आकार....फक्त आकार बदलायच...रंग ..रूप....चव..आणि गुण नाही.....काळाची गरज आहे...आणि आपल्या निसर्गाची शिकवण.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा