कवडसा...
पूर्वी कौलांची घरे होती....पत्र्याची घरे....तेव्हा....त्या पत्र्याला जिथे angel लावलेला असायचा तिथून....आणि कौलारू घराना कौलाच्या मधून....जेव्हा आतमध्ये अंधार असायचा...तेव्हा तिथून एक उन्हाची तिरीप आतमध्ये यायची....कधी दाट गर्द झाडी असायची त्या झाडीमध्ये ही अशीच एक तिरीप दिसायची.....त्या उन्हाच्या येणाऱ्या एका....प्रकाशाच्या रेषेला...कवडसा म्हणत.....
पूर्ण अंधारात त्या कावडस्याचा फक्त उजेड दिसायचा....मग आम्ही पूर्वी त्याला हातात धरत धरत वर न्यायचो..कोण जास्त वर जातो अस खेळायचो....त्या कावडस्याच्या त्या प्रकाशाच्या रेषेत.....धूलिकण पण दिसायचे....आम्ही तेव्हा अप्रूप करायचो हे काय असत...हे काय असत...शाळेला चालल्यावर माहीत झालं...ते धूलिकण.....dust particles... आपल्या आयुष्यात पण असे खूप कवडसे असतात....जे आंधाऱ्या खोलीत एक प्रकाशझोत घेऊन येतात...खोली पूर्ण अंधारी वाटते.... पण त्या कवडस्याकडे पाहिलं की आशा वाटते...उजेड आहे वाटत अजून.....मनात ही कधी कधी खूप अंधार साचलेला असतो...तेव्हा कुठेतरी आठवणींचे कवडसे...आधार वाटू लागतात....जेव्हा शांत एका अंधाऱ्या खोलीत बसलेलो असतो....तेव्हा...अचानक कुठूनतरी उन्हाचा कवडसा आत येतो...आणि थोडासा दिलासा देऊन जातो...आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अंधारी दिवसांमध्ये....प्रकाशाचं काम जो करतो तो म्हणजे आपला कवडसा...
दाट ...गर्द...झाडी जितकी गार आणि शांत असते ...तितकीच ती भयावह ही भासत असते....तिथली शांतता मनाला प्रसन्न तर करतेच.... पण मनात कुठेतरी भीतीच काहूर ही आणते...त्या उठणाऱ्या काहुराला शांत करत ...हळूच वाट काढत एक कवडसा येतो...आणि मन शांत करतो...प्रत्येक वेळी अंधार हा प्रकाश नाही म्हणूनच नसतो....कधी कधी तो... प्रकाश तिथपर्यंत येत नाहीये...किंवा आपण त्या प्रकाशाला तिथपर्यंत येऊ देत नाहीये म्हणूनही असतो.....जेव्हा स्वतःच प्रकाशाला अडवून बसलेलो असतो....तेव्हा मग कुठूनतरी एक कवडसा येतो आणि लक्ष वेधून घेतो.....कदाचित त्यावेळी तो कावडासही आपल्याला नको असतो.... पण जर त्याला निरखून पाहिलं .....त्याच्यातली अंधाराला चीर्ण्याची ताकद पहिली ...त्याच्यातली सगळ्या धूलिकण ना समावण्याची शक्ती पहिली की...तो मग हवा हवासा वाटतो......कवडसा आहे......कवडसा येईल...म्हणून आपण जर अंधार करून बसलो.....प्रकशापासून स्वतःला दूर ठेवले....आणि वाट पाहत बसलो....तर कवडसा ही तोपर्यंत च साथ देईल जोपर्यंत बाहेर प्रकाश आहे...जेव्हा सगळीकडे अंधार पडेल तेव्हा कवडस्याच ही अस्तित्व संपेल....मग जो स्वतःच अस्तित्व संपण्यापासून नाही थांबवू शकला तो आपल्याला काय मदत करणार.....म्हणूनच कितीही कवडसे...मदतीचे...आठवणींचे....आयुष्यात असले...तरी ते temporary....म्हणजे काही काळापुरते असतात....permenent....नसतात......त्यामुळे आठवणींचा सहारा....आणि मदतीची आपेक्षा.....ही temporary च रहाते.....जर आपल्याला त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर यायचं असेल....तर आपल्यालाच त्या खोलीचा दरवाजा उघडावा लागेल..आणि प्रकाशाला आत घ्यावं लागेल.....कवडसे जखमेवर medicine...म्हणजे दवा लावायच काम करतात.... पण दवा ही तर तात्पुरती आराम देते हो ना......क्षणिक आराम हा क्षणिक च असतो....so...कवडसे असावेत.... पण ते फक्त कवडसे च आहेत...हेही माहीत असावं.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा