आयुष्यातले रस्ते....
आयुष्य जगत असताना...खूप रस्ते येतात...जातात... वळणेही खूप येतात ..आणि जातात... पण प्रत्येक रस्ता ..आणि प्रत्येक वळण...हे आधीपेक्षा काहीतरी नवीनच असत....
आयुष्याची सुरुवात जेथे होते....तिथून..आपल्या प्रवासाची सुरवात होते...प्रवास सुरू झाला की...तो हळू हळू स्पीड घेऊ लागतो....मधे मधे...खूप स्पीड breaker येतात...आगदी तिथे प्रवासाची गाडी बंद देखील पडते... पुन्हा गाडीला start करण सोप नसत... पण हळू हळू प्रयत्न केल्यावर start होते....पुन्हा प्रवास सुरू होतो...या प्रवासात खूप लोक भेटतात... काही आपले होऊन जातात...तर काही...काही गोष्टी शिकवून जातात...काही आयुष्यभरासाठी सोबत राहतात...काही सोबती बनून जातात....ही गाडी अशीच सुरू असते...कुठे खड्डे आले तर ते चुकवावेही लागतात... पण खड्डे चुकवताना... तोल नाही जाऊ द्यायचा....नाहीतर गाडी कोसळूही शकते....कधी कधी..विचारांचे... भावनांचे...खूप ट्रॅफिक लागतं.... पण थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो....मग ते ट्रॅफिक ही हळू हळु कमी होत....ट्रॅफिक कमी झालं...योग्य सिग्नल मिळालं की पुन्हा प्रवास सुरू होतो.....कधी कधी..रस्ता खूप चढ उताराचा येतो...सतत चढ आणि उतार.... चढताना चां रस्ता...खूप कठीण वाटतो...कारण चढताना पूर्ण कस लावावा लागतो....खूप मुश्किलीने आपण तोही पार करतो....आणि त्यानंतर उताराचा प्रवास सुरू होतो.... उताराच्या प्रवासात पण स्वतःवर आणि गाडीवर कंट्रोल ठेवावा लागतो.....नाहीतर गाडी तेव्हाही कोसळू शकते... पण हा चढताना चां जो प्रवास असतो तो कायम लक्षात राहतो...कारण तिथे आपला पूर्ण कस लागलेला असतो...असेच खूप चढ उतार पार केले...की....कधी कधी.... वळणा वळण चां रस्ता येतो....या वळणाच्या रस्त्यावर....गाडी च स्पीड वाढवून नाही चालत...गाडी हळू हळू....पुढे न्यावी लागते....नाहीतर प्रवास तिथेच थांबू शकतो.... पण या सगळ्या प्रवासात जर आनंद घेत गेलो तर खूप मिळतो....फक्त गाडीच स्पीड कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं....गाडी कुठे थांबवायची ह्या सगळ्या गोष्टी समजायला हव्यात....अधून मधून....पेट्रोल पण check करत राहावं लागतं...गाडी ठीक आहे का पाहावं लागतं...प्रवास व्यवस्थित व्हायचा असेल तर....गाडी .. आणि सोबती दोन्ही भक्कम असावे लागतात....मग चालवणाऱ्या व्यक्तीवर पण pressure कमी पडत...आणि प्रवास सुखद होतो.....जाणून भुजून रस्ता सोडून कोणीही गाडी जंगलात नेत नसतो..... पण जर चुकून रस्ता भरकटलो ...तर रस्ता दाखवणारे....board खुप असतात... पण आपल्याला परत कोणत्या रस्त्यावर जायचय हे त्या ड्रायव्हर लाच ठरवावं लागत....त्यामुळे...आयुष्य सुंदर आहे.....रस्ते खराब येतील..... पण साथीदार...आणि आपला आपल्या गडीवरचा कंट्रोल जर नीट असेल ...तर कोणताही प्रवास असू देत सुखाचाच होईल....
....
.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा