Seesaw...
वजन तांगडी....
कोनिकोनी लक्षात ठेवले आहे.... कोणा कोणाला आठवतंय बघा....लहानपणी ..गावाकडे...आपण वजन तंगडी म्हणून कशाने खेळायचो...
आपल्याला city मधे असतात तशा तर माहीतच नव्हतं...गावाकडे...एक मोठा दगड असायचं...त्यावर एक मोठी फळी ठेवायची आणि त्यावर दोन्ही बाजूला बसायचो आणि खेळायचो...पुन्हा तीच फळी उभी लावायची आणि घसरगुंडी खेळायची...मज्जा असायची ...कधी कधी...झाडाच्या मधे एक काठी टाकायचो ..आणि त्यावर बसून वजन तंगडी खेळायचो...किती आनंद असायचा....त्यावेळी साधने नव्हती ...निर्माण करायची ...खेळायची curiasity होतीहौस होती....आनंदी रहण्यासाठी ...खेळण्यासाठी आपल्याला...साधने ...खेळणी लागतच नव्हती....
मुली..
जिबली,लंगडी,संसार,भातुकली,पकडपकडी,आईचे पत्र,झाडाला बांधलेला झोका....आंधळी कोशिंबीर असे बरेच खेळ खेळायचो...आता आठवतही नाहीयेत....
मुले....
Bat ball.. चिनी दांडू ...आबाधबी....पकडापकडी....लपाछपी....
आणि इतर बरेच
झाड का पाणी...डोंगर का पाणी...सागरगोटे...झाडाला tayre च झोके...हुतूतू...त्यावेळी आम्हाला पतंग माहीत नव्हता फार...आम्ही दोरीला प्लास्टिक ची पिशवी बांधायचं आणि हातात धरून पळायचो....त्या पिशवीत जशी जशी हवा भरायची ती पिशवी वर वर उडायची....मग आम्ही पळतच जायचो...खूप मज्जा यायची ते खेळ खेळायला....त्यावेळी साधने काहीच नसायची पण आनंद ...खेळायची हौस...खूप असायची...खेळायला जायला मिळालं तरी खूप आनंद व्हायचा....
खेळ खेळत असताना ....खूप गमती घडायच्या....कोणाची pant फाटणार......कोणाला लागणार...बऱ्याच गोष्टी व्हायच्या..... पण आनंद असायचा....
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दुपारी उन असायचं आई बाहेर जाऊ द्यायची नाही...मग घरी पण..गाई गद्या...
सापशिडी ...चोर पोलिस ... चिठ्यांचे खेळ...हे चिठ्यांच खेळ तर आम्ही शाळेत लेक्चर सुरू असताना पण खेळायचो....कोणाला कळत पण नव्हत..खूप भारी असायचं.....परत चिंचोके च खेळ...काचकवड्या....काच हलू न देता...दुसरी काच काढायची...कुठे गेले ते दिवस....सोंगटी छा खेळ....
तेव्हा फक्त खेळायचा असायचं....ना मोबाईल ...ना टिव्ही....ना आजकाल सारखे आलिशान पार्क....गार्डन...nothing.....तेव्हा खेळ होते ईच्छा होत्या... हौस होती....साधने मायने नव्हते.... पण आता साधने आहेत... पण ईच्छा नाहीत...हौस च नाही मुलांना खेळायची....फक्त मोबाईल किंवा टिव्ही...आणि यासाठी दोष दिला जातो पालकांना...कदाचित असतीलही दोषी....पूर्वी साधने नव्हती तेच खर आयुष्य होत...आता पाहिजेत ती आणि पाहिजेत तशी साधने आहेत ...हीच समस्या आहे....
खरं तर या गोष्टींची अजिबात गरज नव्हती..... पण काळ बदलत गेला...आणि सगळच बदललं....
असो...
हा तराजू पाहिलं ना की आता फक्त.... तोलले जाण्याच्या गोष्टीचं आठवतात....आता फक्त तोललेच जाते आहे....ती निखळता...निखळ ली ....कुठेतरी...आयुष्यात आता फक्त हा आधुनिक तराजुच उरलाय....ज्याच्यासोबत कोणत्याच भावना नाहीत...फक्त जबाबदारीच पर्डे आहेत...जे रोज तोलले जात आहेत....कधी कर्तव्य कडे तर कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या....बास्स...या सगळ्या आधुनिक खेळांमध्ये .... साधनांमध्ये....आधुनिकता आली....diciplane आला ... पण कोरडेपणा पण येत गेला नकळतपणे..... आता उरलाय फक्त तराजू....वजन तंगडी....काळाबरोबर गेली...उरलाय फक्त seesaw ....पिशव्या उडवायचो...ती जागा पतांगा ने घेतली ...आणि गळे कपणारा मांजा आला....चिनी दांडू ने.... कोलू का....कोल....कोल...करत...त्या तर खेलालाच कोलाला गेलं ...कोरडे पणाच्या या जगात games आल्या...आणि आमचे ओलावा ..आनंद ...देणारे खेळ... कालबाह्य..झाले...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा