आज बाहेर गेलो होतो...तिथं पाहिलं मी....एक निवडुंग ...काटेरी निवडुंग...त्याला खूप काटे होते...
आजकाल लोक त्याला एक शोभेचे झाड म्हणून घरात लावतात...त्याचा खरा उपयोग तर काहीच जणांना माहीत असेल....
हे निवडुंग हे एक medicinal plant आहे...
पूर्वी प्लेग च्य गाठींवर याचा चिक लावला जायचा...याच्यामध्ये 38%राळ, 18%डिंक, 12%calcium hydroxide, 10%इतर घटक, 22% निवडुंग सत्व असत....
खर कारण निवडुंग घरात लवण्यामागच तर हे आहे की...निवडुंग carbon dioxide ची पातळी कमी करून तणाव कमी करण्यास मदत करत.... स्ट्रेस....तणाव कमी करण्यासाठी आजकाल लोक निवडुंग ला घरी लावत आहेत....
पूर्वी ...आम्ही लहान होतो तेव्हा...तो निवडुंग ओढया शेजारी पहायचो...त्याची फळे खायचो..काटे लागायचे...मग आई कडे यायचो रडत....आजकाल तो निवडुंग घरी लावावा लागतोय...म्हणजे पूर्वी तणाव बाहेर होता...निवडुंग ही बाहेर होता... पण आता तणाव घरात आहे म्हणून निवडुंग ही घरतच आले....पूर्वीची लोक बरोबर बोलायची...काटे असणार झाड घराभोवती लावयच नाही....खर तर ते अस का बोलायचे हे कधीच कोणाला समजल नाही....काटे असंनारी झाडे ही ती लांब ठेवायची आणि तणाव ही लांब असायचा... पण आता काटे ची झाडे घरात ...आणि तणाव डोक्यात.... असं झालंय....strees.... हा आजकालच्या लाईफस्टाईल च एक आविभाज्य घटक बनला आहे....
असो...मला ते निवडुंग च झाड खूप आवडते....त्याच्या कडे पाहिलं ना तरी बर वाटत...एव्हढे त्याचे फायदे आहेत....जेव्हढे त्याचे काटे असतात....कोणताही गोड फळ खायचं असेल तर आधी काटे लागून घ्यावे लागतात...निसर्ग पण खूप कमाल करतो...आपल्याला त्याची कमाल कधीच नाही समजत....निवडुंग खर तर राजस्थानचा ....त्या वाळवंटात ऑक्सिजन and carbon dioxide madhe balnce राहण्यासाठी तिथे त्याच अस्तित्व निर्माण झालं...म्हणजे आपल पण या निसर्गाने काहीतरी purpose असेल म्हणून ठराविक भागात ...ठराविक लोकांमध्ये...अस्तित्व निर्माण केलं असेल का...?..
निवडुंग ची एक खास ओळख असते त्याचे काटे...तसच आपल्या सर्वांमध्ये एक खास ओळख असते...काही जणांना ती समजते काहींना ती कधीच नाही समजत...आपण सगळे आजकाल त्या निवडुंग सारखे रुख्श होत चाललोय....तो फक्त वरून रुक्ष आहे... पण आपण सगळे आतूनही रुक्ष होतोय....बर झालं देवाने त्याला मानवी वस्तीत नव्हत घडवलं...नाहीतर तोही कदाचित आत्तापर्यंत रुक्ष झाला असत आतून.... आता आलाय वस्तीत तोही....होईल हळू हळू....असो...निवडुंग एक गोष्ट खूप छान शिकवतो...बाहेरून तुम्ही कितीही काटेरी असा....कितीही रुक्ष असा....
पण आतमध्ये ओलावा कायम असायला हवा...जर तो ओलावा कमी कमी व्हायला लागला...तर निवदुंगासारखे आपण पण एक दिवस नक्की कोलमडून पडू....या धकाधकीच्या आयुष्यात आजकाल आपला पण निवडुंग होतोय पण फक्त बाहेरून....आतला आणि खरा निवडुंग आपल्याला कधी कळलाच नाही....आजकाल माणसाला माणसाजवळ बसल्यावर streess free होता येत नाहीये.... पण ते निवडुंग एक झाड असून माणसाचं काम करत आहे.....एक निवडुंग एका माणसाची जागा घेतय......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा