काल एक फुलपाखरू उडत उडत येऊन समोरच्या एका फुलावर बसले.....ते खूप छान ..नाजूक..रंगीबेरंगी होत...खूपच सुंदर होत ते....त्याच्याकडे फक्त पाहतच बसावे असे वाटत होत...ते खूपच आकर्षित करत होत...म्हणून मी हळूच त्याच्या जवळ गेले....तर ते उडून गेलं...ते जेथून उडल तेथे जाऊन पाहिलं ...तर मी स्तब्ध झाले.....ते फुलपाखरू त्याच्या छोट्या पिलाला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत ...ते बिचारे एका जाळ्यात ..कोष्ट्याच्या अडकल होत... पण त्याला बाहेर येताच येत नव्हत...ते पिल्लू जे होत...ते काळ्या रंगाचं होत...आईसारखे ते काही फारसे आकर्षक नव्हत दिसत.... पण तरीही निरागस होत...त्याला निघायचं होत तिथून....त्याची आई त्याला सोडवायला आली की तीच सौंदर्य पाहून तिला पकडायला कोणी ना कोणी मुलगा याचाच....हे अस खूप वेळ सुरू होत.....मी तिथं जाण्याआधी म्हणजे ती वाचवत होती पिलाला... पण तिचं जे सौंदर्य होत ते आड येत होत....लोक पण तिला पकडायला यायचे ... पण ते पिल्लू अडकलेले दिसत असूनही त्याला सोडवण्यासाठी कोणी फारसे प्रयत्न करत नव्हते... कारण ते आकर्षक नव्हते आणि लोकांना त्याच्यात अजिबात रस नव्हता....ती आई बिचारी तडफडत होती....मी कोणाच्या हाती लागले तर .... माझे काही होऊ दे पण ...माझ्या पिलाला कोण सोडविणार मग....तिला स्वतःला लोकांपासून आणि पिलाला संकटापासून वाचवायचं होत.... पण...पिल्लू जाळ्यात अडकले होते...आणि आई...लोकांच्या चिमटीत न निस्टण्यासाठी धडपडत होती....समाजातील एक विदारक ...भयानक वास्तव मला तिथं दिसत होत....त्या फुलपाखराची धडपड काय सुरुये हे कोणीच नव्हत पाहत...पाहिलं जात होत ते फक्त त्या फुलपाखराची सुंदर पंख ....ते तिथं पिलाजवल गेले की लोक त्याला उडवायचे...पकडायला धावायचे...ते खूप हतबल झालं होत बिचारे....आपल्या ह्या मानवी वस्तीतल वास्तव मला हुबेहूब तिथं दिसत होत...कोणालाही माहीत नसत समोरची व्यक्ती काय परिस्थितीत आहे....त्याची समस्या काय आहे...ती त्या प्रसंगात झुंझात आहे काय....काहीही माहीत नसत....आपण फक्त आपल्याला जे समोर उडणारे फुलपाखरू दिसतय त्याला पाहून आपण आंदाज बांधत असतो....आजकालची सामाजिक बांधिलकी हि फक्त त्या फुलपाखरू ला उडविण्यात आणि पकडण्यात मजा घेण्यापूर्तीच उरलिये....एखादा खरंच एखाद्या गोष्टीसाठी झगडत असतो.... पण आपण पूर्ण सत्य जाणून न घेता...त्याची मदत करण्याऐवजी ...त्याची मजा बघत असतो....आपल्याला माहीतच नसत की त्याला कुठल्या जाळी ने घेरले आहे....आपण फक्त जे समोर रंगबिरंगी उडणारे फुलपाखरू बघतो आणि अंदाज बांधत राहतो की..ते मजा घेत आहे...कधी कधी समोर दिसणारी मजा ही नेहमी मजाच नसते...त्यापाठीमागे खूप मोठं आणि वेगळं....वास्तव ही असू शकतं ...
एखाद्या द्रव पदार्थामध्ये दुसरा एखादा घटक जेव्हा पूर्णपणे विरघळून जातो...तेव्हा एक solution तयार होत....solution तयार होण्यासाठी solvent strong असावा लागतो....जस की water ... म्हणजे पाणी.....त्याच्यात सगळ्या गोष्टींना सामावून घ्यायची ताकद आहे....जेव्हा solvent strong असतो ...तेव्हा solute काहीही असू दे ...ते विरघळत च ... तस आपल पण हवं होत ना....आपण ही एक solvent व्हायला हवं.....म्हणजे कोणताही ...कसलाही..solute.... आला तरी आपण त्याला सामावून घेऊ शकलो असतो....जे science निसर्गात आहे....त्याचा शोध आपण घेतला...त्याचे experiments केले...pn te आत्मसात करता नाही आल आपल्याला.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा