"दिल है छोटासा.... छोटीसी आशा....." ... Hope.... आशा.... आशा.....हा शब्द असा आहे ...जो जगण्याचा मार्ग देतो....जे आहे ते बदलेल...आणि नवीन काहीतरी होईल....हे कोणताही ज्योतिष येऊन सांगितला तरी आपण तात्पुरते....motivate होऊ शकतो..... पण आयुष्यभरासाठी च motivation हे आशेतून येत....आणि आशा ही self motivated असते.....जी आपल्या स्वतः मधे असते....म्हणजे जगण्याचा मार्ग....ताकद सगळं स्वतः त असताना आपण त्या मृगा सारखे ते शोधत फिरत असतो.... आपल्याकडे काहीही नसले तरी चालेल पण माणुसकी हवी...अस म्हणतात....माणुसकी हवीच....गरज आहे....भावना आहे ती... पण आशा हा जीवनाचा मार्ग आहे....जीवनाची सुर वातच आशेने होत असते.... खर तर ज्यांची आशा संपते ....त्यांचं आयुष्य थांबत..... एका आभांगमध्ये संत तुकाराम महाराज सांगून गेलेत.... आशा हे समूळ खानोनी काढावी l तेव्हाची गोसावी व्हावे तेने ll१ll नहीं तरी सुखे असावे संसारी l फजिती दुसरी करू नये ll ध्रु.ll आशा मारूनिया जयवंत व्हावे l तेव्हाची निघावे सर्वांतूनी ll २ ll तुका म्हणे जरी योगाची तांतडी l आशेची बिबुडी करी आधीं ll ३ ll महाराज ही सांगून गेले...
मुजरा करताना....नमस्कार करताना.....जस थोड झुकाव लागतं....तसच...बाकीच्या काही गोष्टी अशा आहेत...ज्यांना जपताना थोड झुकावं लागतं.....कोणासमोर तरी झुकण...म्हणजे नेहमी कमीपणाचे असते अस नाही ना......कधी कधी....आपल झुकाण हेच आपल्याला मोठेपणा देऊन जात.....कमी पणा...मोठेपणा...या मानवनिर्मित संकल्पना आहेत खरं तर....नाहीतर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा महान च आहे... कारण प्रत्येकाचा संघर्ष हा दिसत नसला...तरी अस्तित्वात ...आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात असतोच.....पाणी एका भांड्यात भरलेले असो...किंवा समुद्रात....त्यात जोवर खडा पडत नाही तोवर ते शांत च वाटत...फरक फक्त इतकाच आहे....भांद्यातल्या पाण्याला आवरता येत....कारण त्याला वेग नसतो..... पाण्याच्या वेगलां ही कधी कधी आवरता येत...पण ...माणसामध्ये जो आवेग असतो....तो आवरता येणं कठीण असत..... सगळ्या गोष्टी मर्यादेत असतात तोवर रमणीय असतात....पण तेथून ओलांडल्या की.....वाहतात.... वाहायला लागल्या की ....वेग येतो.... वेग आवरण्यासाठी.....त्याला झुका व लागतं ...किंवा मग...दुसरे कोणालातरी..... गाडीचा स्पीड control करण्यासाठी...आपण break लावतो.....एकदम break ला...